संत गजानन भक्त परिवार आणि गजानन महाराजांच्या उपासना
संत गजानन भक्त परिवार हा "श्री गजानन भक्तांचा, भक्तांसाठी, भक्तांद्वारे" चालवला जाणारा आणि गजानन महाराजांच्या संकेतानुसार तयार झालेला "एक अध्यात्मिक भक्ति ग्रुप" आहे. ह्या परिवाराची स्थापना "श्री शशिकांत पोकळे दादांनी" २१ जानेवारी २००८ ला केली. १३ भक्तांपासून सुरु झालेल्या ह्या परिवारामध्ये आज जगाच्या पाठीवरील लाखो भक्त ह्या जोडले गेले आहेत. आणि म्हणूनच परिवाराच्या उपासनेमध्ये भक्त हजारोंच्या संख्येने भाग घेतात. संत गजानन महाराज भक्त परिवाराच्या सर्व उपासना "नि:शुल्क, निरपेक्ष, नि:स्वार्थ, निरंतर, निष्काम सेवा" ह्या तत्वावर चालतात. गजानन महाराजांच्या भक्तांनी देणगी / पैशासाठी कुणाकडेही हात पसरवू नये अशी परिवाराची भूमिका आहे. भक्ती मध्ये पैशाची कुठेही गरज नाही. गजाननाचे कुठलेही कार्य अधुरे / अपूर्ण राहत नाही असा आमचा पूर्ण विश्वास आहे. उपासनांमध्ये भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क कुणीही आकारू शकत नाही ह्याची नोंद घ्यावी. परिवाराच्या बहुतांशी उपासना ह्या सामुहिक उपासना आहेत. परंतु ह्या सर्व उपासना वैयक्तिकपणने घरीही करण्याची मुभा आहे. महाराजांच्या उपासनांमध्ये नियमांचे पालन आणि शिस्त फार महत्वाचे आहे.
काही ठळक वैशिष्ट्ये
• परिवाराच्या सर्वच उपासना आता जागतिक स्तरावर चालतात.
• जागतिक पारायणाचे आयोजन करून जगाच्या पाठीवरील लाखो भक्तांना महाराजाच्या उपसनांमध्ये एकत्र आणले.
• गण गण गणांत बोते ह्या मंत्राचा दरवर्षी गुढीपाडवा ते गुरुपोर्णिमा ह्या काळांत जप होतो. २०२० मध्ये ह्या काळांत *१५७ कोटी पेक्षा जास्त* जप फक्त केला गेला.
• संजीवन समाधी दिन पारायणात २०१८ मध्ये १,०६,३६५ (एक लाख सहा हजार तीनशे पासष्ट) भक्तांनी सहभाग नोंदविला.
• २१ जानेवारी २०१८ ला अमरावती महापारायणात ४०००० भक्तांनी एकाच दिवशी, एकाच वेळी एकाच ठिकाणी पारायण केले (हा एक विश्व विक्रम आहे) आणि जवळजवळ एक लाख भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
• गुरुवार पारायणामध्ये दर गुरुवारी जगभरातील हजारो भक्त श्री गजानन विजय ग्रंथाच्या एका अध्यायाचे न चुकता पठण करतात.
.श्रद्धा ठेऊन भक्ती करावी, अंधश्रद्धा पसरवु नये असा परिवाराचा मापदंड आहे.
संत गजानन भक्त परिवाराच्या उपासना
१) जागतिक पारायण दिवस
जगभरातील गजानन भक्त दरवर्षी जानेवारीचा दुसरा रविवार जागतिक पारायण दिवस म्हणून पाळतात. ह्या दिवशी श्री गजानन विजय ग्रंथाचे एक दिवसीय पारायण - एक गुरु, एक दिवस, एक वेळ, एक साधना ह्या तत्वावर आधारित आहे.. दरवर्षी जागतिक पारायणामध्ये हजारो भक्त श्री गजानन विजय ग्रंथाचे संपूर्ण पारायण करतात.
२) गुरुवारचे पारायण
हि उपासना २००८ पासून सुरु आहे. २१ भक्तांचा एक ग्रुप बनवून दर गुरुवारी त्यातील प्रत्येक भक्ताने श्री गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय वाचणे . गुरुवार पारायणाचे असे हजारो ग्रुप्स आहेत. असे निदर्शनास आले आहे कि काही लोक हि उपासना सुरु करतात परंतु संत गजानन भक्त परिवाराच्या नियमाचे पालन करीत नाही आणि मग हे ग्रुप्स बंद पडतात हे योग्य नाही. उपासना कोणीही करू शकतात. फक्त नियमाप्रमाणे व्हावी हि एकच अपेक्षा आहे. ग्रुप तयार करण्याआधी संत गजानन भक्त परिवाराशी संपर्क केला तर नियमाप्रमाणे अगदी शिस्तीत ही पारायण उपासना अखंडपणे सुरु राहते. आजमितीला गुरुवार परायानांचे ३३५० पेक्षा जास्त ग्रुप्स आहेत.
३) एकवीस दिवसीय पारायण
२१ दिवस दररोज एक अध्याय वाचुन हे पारायण केल्या जाते – महाराजांचा प्रकटदिन, गुरुपौर्णिमा, संजिवन समाधी दिन (ऋषिपंचमी), आणि गुढीपाडव्याच्या च्या एकवीस दिवस आधी हे पारायण सुरु होते. लाखो भक्त ह्या उपसनांमध्ये भाग घेतात.
४) श्री गजाननबावंनी पठण
दररोज आपआपल्या घरी श्री गजानन महाराजांची "गजाननबावंनी पठण" करावी शक्य असल्यास दिवे लागणीला अथवा रात्री ठीक ९ वाजता हि उपासना करावी.
५) वार्षिक श्री गजानन दर्शन
दर वर्षी एकदा तरी शेगावला जावून श्री गजानन महाराजांचे दर्शन घेणे. दरवर्षी साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जागतिक पारायणासंबंधी एका बैठकीचे आयोजन केले जाते. परिवारातील जास्तीत जास्त भक्तांना महाराजांचे दर्शन घडावे हा ह्या उपासनेचा उद्देश आहे.
६) श्री गजानन उपासना केंद्र
जेथे श्री गजानन मंदिर आहे तेथे मंदिरात किंवा जेथे मंदिर नाही त्या गावात श्री गजानन भक्तांनी एक श्री गजानन उपासना केंद्र स्थापन करावे आणि सर्वांनी मिळून दर गुरुवारी कमीतकमी १ तास ३० मिनिटे श्री गजाननाची साधना करावी. सध्या जवळजवळ १० उपासना केंद्रे आहेत.
७) मंत्रजप उपासना
दरवर्षी हिंदु नववर्ष गुढीपाड्व्यापासून ते गुरुपोर्णिमे पर्यंत “गण गण गणांत बोते” मंत्रजप उपासनेचे आयोजन केले जाते. २०२० मध्ये *१५७ कोटी पेक्षा जास्त मंत्रजप महाराजांच्या चरणी समर्पित करण्यात आला.
८) अधिकमास उपासन
दर तिन वर्षांनी येणार्या पवित्र अधिकमासामधे शुद्ध दशमी एकादशी द्वादशीला तिन दिवसिय पारायण अथवा अधिकमास उपासना. ह्या उपासनेचे स्वरुप दरवर्षी बदलु शकते. जसे की मंत्रजप, पारायण, ई.
९)महापारायण
दरवर्षी एका मोठ्या शहरात महापारायण आयोजन करण्यासाठी मनापासुन प्रयत्न करणे. आणि महापारायणासाठी भक्त जुळविण्यास शहर पातळीवरील महापारायण समितीला मदत आणि मार्गदर्शन करणे. महापारायणामध्ये कमीत कमी ११००० भक्तांनी भाग घ्यावा असा प्रयत्न शहर पातळीवरील समितीने करावा हि अपेक्षा आहे.
१०) दशमी एकादशी द्वादशी उपासना
दर महिन्याच्या दशमी एकादशी द्वादशीला तिन दिवसिय पारायण – परिवारातील हजारो भक्त हि उपासना करतात.
११) जिल्ह्याच्या ठिकाणी कारागृहांमध्ये पाराायणाचे आयोजन करण्याचा प्रयत्न करणे, पारायणाचे आयोजन करणे.
१२) प्रासंगिक विशेष उपासना
ह्या सर्व उपासना संत गजानन भक्त परिवाराच्या नियमानुसारच व्हाव्या हि दादांची व परिवाराची रास्त अपेक्षा आहे. ह्याची सर्व आयोजकांनी / संयोजकांनी नोंद घ्यावी. परिवाराच्या बहुतेक उपासना घरी करण्याची मुभा आहे त्यामुळे जास्तीत जास्त भक्तांना सहभागी होता येते. सर्व उपासना अगदी साधेपणाने कराव्यात. ह्या व्यतिरिक्त श्री दादांनी संकल्पना मांडलेल्या आणखी काही उपासना वेळोवेळी ह्या यादित जोडल्या जातील. ह्या परिवाराच्या सगळ्या उपासनांवर श्री महाराजांचे लक्ष आहे याची सातत्याने जाणीव होते व याचा अनुभवही भक्तांना येतो, म्हणून कोपी पेस्ट भक्तांनी उपासना सुरु करण्यापूर्वी सावध राहावे. फक्त नावासाठी उपासना करण्याची विकृती श्री महाराजांना कशी बरे रुचेल म्हणुनही काळजी घेणे योग्य.
आजच संत गजानन महाराज भक्त परिवार जॉईन करा आणि वरील कार्यक्रमात भाग घेऊन, श्री गजाननाची सेवा करून पुण्याचे भागीदार व्हा.
अधिक माहिती साठी संपर्क करा – ९७३७३४४४५६
संजय इंगळे
संत गजानन भक्त परिवार
|| पाठीशी असता गजानन गुरु, व्यर्थ मी चिंता कशाला करू ||