Pragat Din Parayan Upasana
24-01-2023 to 06-02-2023

संत गजानन भक्त परिवार

जय गजानन I  जय गजानन II जय गजानन III

प्रगटदिन पारायण उपासना

अत्यंत साधी सरळ व सोपी उपासना. २१ दिवस २१ अध्याय. दररोज फक्त एक अध्याय

सर्व गजानन महाराज भक्तांना कळविण्यात अतिशय आनंद होतो कि, आपल्या सर्वांची चैतन्यमयी, सर्वव्यापी, अंतर्ज्ञानी, चराचरांत वास करणारी गुरुमाऊली ब्रम्हांडनायक संत शिरोमणी श्री गजानन महाराजांचा प्रगटदिन ह्यावर्षी दि १३ फेब्रुवारी २०२३  (सोमवार) ला आहे. त्यानिमित्य दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी देखील आपल्या परिवाराने २१ दिवसीय प्रगटदिन पारायणाचे आयोजन केले आहे.

गजानन महाराज भक्ताना विनंती गावागावात घरोघरी मंदिरामंदिरात पारायण होऊ द्या.

प्रगटदिन २१ दिवसीय पारायण २४ जानेवारी  २०२३ ते १३ फेब्रुवारी २०२३

त्या शेगांव सरोवरी भले I गजानन कमल उदया आले I

जे सौरभे वेधते झाले I या अखिल ब्रम्हांडा II

दि २४ जानेवारी  २०२३  (मंगळवार) ला पहिला अध्याय वाचावा त्यानंतर दररोज एक अध्याय वाचावा.  १३ फेब्रुवारी २०२३   (श्रींचा प्रगटदिन ) ला  सकाळी ११ वाजता सर्व भक्तांनी आधी पहिला व त्यानंतर  २१ वा अध्याय  वाचावा आणि वाचन झाल्यावर  सर्वांनी एकाच वेळी सकाळी ११:४५ ला आरती, मंत्रपुष्पांजली, गजानन बावंनी, २१ नमस्कार, अष्टक, गण गण गणांत भजन आदि करून पारायणाची सांगता करायची आहे. (आरती वगैरे सर्व तुम्हाला नंतर पाठविण्यात येईल)

अध्याय वाचनाची वेळ – पहाटे ५ ते रात्री ९:३० वाजेपर्यंत राहील कारण ह्या वेळांत आपले शेगांवचे मंदिर उघडे असते. अध्याय सोयीनुसार घरी किंवा मंदिरात वाचायचा आहे. ग्रुप असेल तर मंदिरात वाचणे योग्य.

श्री गजानन विजय हा ग्रंथच वाचावा (ग. म. संस्थान शेगांव ह्यांनी प्रकाशित केलेला ग्रंथ),

तारीख                  वाचावयाचा अध्याय          

२४ जानेवारी २०२३  ... अध्याय १        

२५ जानेवारी २०२३  ... अध्याय २                   

२६ जानेवारी २०२३  ...अध्याय ३        

२७ जानेवारी २०२३  ...अध्याय ४                    

२८ जानेवारी २०२३  ...अध्याय ५                    

२९ जानेवारी २०२३  ...अध्याय ६                    

३० जानेवारी २०२३  ...अध्याय ७        

३१ जानेवारी २०२३  ...अध्याय ८                    

०१ फेब्रुवारी २०२३  ...अध्याय ९                     

०२ फेब्रुवारी २०२३  ...अध्याय १०       

०३ फेब्रुवारी २०२३  ...अध्याय ११

०४ फेब्रुवारी २०२३ ...अध्याय १२

०५ फेब्रुवारी २०२३  ...अध्याय १३

०६ फेब्रुवारी २०२३   ...अध्याय १४

०७ फेब्रुवारी २०२३ ...अध्याय १५

०८ फेब्रुवारी २०२३  ...अध्याय १६

०९ फेब्रुवारी २०२३   ...अध्याय १७

१० फेब्रुवारी २०२३   ...अध्याय १८

११  फेब्रुवारी २०२३   ...अध्याय १९

१२ फेब्रुवारी २०२३   ...अध्याय २०

१३ फेब्रुवारी २०२३   ...अध्याय १ आणि २१

एकदा नांव नोंदवले की दररोज अध्याय वाचल्याचे कळविण्याची गरज नाही. अध्याय मात्र दररोज न चुकता वाचावा. ह्या काळात भगिनींची समस्या असली तर त्यांनी घरच्या कुणा कडून अध्याय वाचन करून घ्यावे किंवा नंतरच्या काळात राहिलेले अध्याय वाचून पारायण पूर्ण केले  तरी चालेल मात्र अध्याय सोडू नये. काही शंका असल्यास सायंकाळी ४ ते ६ ह्या वेळेत ९७३७३४४४५६ ह्या नंबर वर फोन करावा. मेसेज पाठवू नका. मला येणाऱ्या मेसेजेसची संख्या लक्षात घेता मेसेजला उत्तर देणे शक्य नाही.

गण गण गणांत बोते

गमभ शशिकांत पोकळे दादा

पाठीशी असता गजानन गुरु

व्यर्थ मी चिंता कशाला करू