*संत गजानन भक्त परिवार*

जय गजानन

*संजीवन समाधीदिन सोहळा - २१ दिवसीय पारायण २०२२*

संत गजानन भक्त परिवाराशी जुळलेल्या सर्व भक्तांना सूचित करण्यात येत आहे कि ह्यावर्षी आपल्या गुरुमाऊलीचा संजीवन समाधीदिन सोहळा म्हणजेच ऋषीपंचमी दि ०१ सप्टेंबर २०२२, गुरुवारला आहे.

विशेष म्हणजे शके १८३२ म्हणजेच ई.स. १९१० साली  श्री गजानन महाराजांनी संजीवन समाधी घेतली तो दिवस सुद्धा गुरुवारच होता.

*मी गेलो ऐसे मानु नका I भक्तीत अंतर करू नका I कदा मजलागी विसरू नका I मी आहे येथेच II*

महाराजांची हि ग्वाही म्हणजेच आजही ते आपल्यात संजीवन स्वरुपात असल्याची ग्वाही आहे आणि आपण सगळे भक्त नेहमीच त्याची प्रचीती घेतोच.

संत गजानन भक्त परिवाराच्या उपासनामधील *संजीवन समाधीदिन सोहळा  - २१ दिवसीय पारायण* ही एक महत्वाची उपासना १२ ऑगस्ट २०२२ ला सुरु होत आहे. *ही उपासना चातुर्मासात असल्यामुळे जास्तीत जास्त भक्तांनी ह्या उपासनेत सहभागी व्हावे ही विनंती.* दरवर्षी प्रमाणेच ह्यावर्षीदेखील  लाखो भक्त जुळावेत अशी आपली इच्छा आहे. (आपण संकल्प करीत नाही आपण महाराजांच्या चरणी इच्छा व्यक्त करतो हे लक्षात असू द्यावे.) महाराज ही इच्छा नक्कीच पूर्ण करतील. आपल्या परिवारात लाखो भक्त जुळलेले असल्यामुळे आपण सर्वांनी प्रयत्न केले तर १ लाख भक्त सहज जुळतील.

*ह्या उपासनेत अध्याय वाचनाची वेळ – पहाटे ५ ते रात्री ८  वाजेपर्यंत असली तरी सकाळीच अध्याय वाचणे  चांगले राहील. अध्याय घरीच वाचायचा आहे.

फक्त एकदाच नांव नोंदणी करावी वेगवेगळ्या संयोजकाकडे नांव नोंदणी करू नये.

*अतिशय महत्वाचे*

दि १२ ऑगस्टला पहिला अध्याय वाचावा त्यानंतर दररोज नियमित एक अध्याय वाचावा.  १ सप्टेंबर  (ऋषीपंचमी - संजीवन समाधीदिन) गुरुवारला २१ वा अध्याय येतो. सर्व भक्तांनी २१ वा अध्याय  सकाळी ११:०० ला वाचावा. ज्यांना शक्य असेल अशा सर्व भक्तांनी एकाच वेळी म्हणजे *सकाळी ठीक ११:३० वाजता* आपापल्या घरीच नेहमीप्रमाणे आरती, गजानन बावंनी, २१ नमस्कार, अष्टक, गण गण गणांत बोते भजन आणि पुष्पांजली करून पारायणाची सांगता करायची आहे. त्यानंतर महाराजांना आपल्या घरी तयार झालेल्या सात्विक भोजनाचा नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतरच आपण प्रसाद ग्रहण करावा.

*एक गोष्ट नमूद करणे आवश्यक आहे. काहींच्या सांगण्या वरून बरेच भक्त महाराजांना  झुणका भाकरीचाच नैवेद्य करतात. असे आवश्यक नाही आणि योग्य हि नाही. हि चुकीची समजूत आहे. महाराजांना सर्व प्रकारचे सात्विक भोजन आवडते, अगदी पक्वान्ने सुद्धा महाराजांना आवडतात, हे लक्षात घ्यावे.  आपल्याला जमेल तसा सात्विक नैवेद्य करावा.*

हे पारायण अशाप्रकारे करावे

दिनांक    ...                                 अध्याय नंबर

१२ ऑगस्ट २०२२ (शुक्रवार)              ...         १

१३ ऑगस्ट २०२२ (शनिवार) ...         २

१४ ऑगस्ट २०२२ (रविवार) ...         ३

१५ ऑगस्ट २०२२ (सोमवार) ...         ४

१६ ऑगस्ट २०२२ (मंगळवार)            ...         ५

१७ ऑगस्ट २०२२ (बुधवार)               ...         ६

१८ ऑगस्ट २०२२ (गुरुवार)               ...         ७

१९ ऑगस्ट २०२२ (शुक्रवार)             ...         ८

२० ऑगस्ट २०२२ (शनिवार)             ...         ९

२१ ऑगस्ट २०२२ (रविवार) ...         १०

२२ ऑगस्ट २०२२ (सोमवार) ...         ११

२३ ऑगस्ट २०२२ (मंगळवार)            ...         १२

२४ ऑगस्ट २०२२ (बुधवार)               ...         १३

२५ ऑगस्ट २०२२ (गुरुवार)               ...         १४

२६ ऑगस्ट २०२२ (शुक्रवार)             ...         १५

२७ ऑगस्ट २०२२ (शनिवार) ...         १६

२८ ऑगस्ट २०२२ (रविवार) ...         १७

२९ ऑगस्ट २०२२ (सोमवार) ...         १८

३० ऑगस्ट २०२२ (मंगळवार)            ...         १९

३१ ऑगस्ट २०२२ (बुधवार)               ...         २०

०१ सप्टेंबर २०२२ (गुरुवार)             ...         २१ (ऋषीपंचमी –  संजीवन समाधीदिन )

 

एकदा नांव नोंदवले कि दररोज वाचल्याचे कळविण्याची गरज नाही. अध्याय मात्र न चुकता वाचावा. *ह्या काळात भगिनींची अडचण असली तर त्यांनी घरच्या कुणाकडून अध्याय वाचन करून घ्यावे किंवा नंतरच्या काळात राहिलेले अध्याय वाचले तरी चालेल मात्र अध्याय सोडू नये.*

गण गण गणांत बोते                                                           

गमभ शशिकांत पोकळे दादा

*पाठीशी असता गजानन गुरु*

*व्यर्थ मी चिंता कशाला करू*

 

उपासना सांगता - आरती आणि स्तोत्रे